मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास

By नितिन गव्हाळे | Updated: September 17, 2022 20:30 IST2022-09-17T20:29:54+5:302022-09-17T20:30:21+5:30

आरोपी तिचा १० ते १५ दिवसांपासून पाठलाग करीत होता.

misbehaviour of girl three years imprisonment for youth crime news | मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास

मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास

अकोला: शौचालयास गेलेल्या मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा वाटेल असे अश्लील वर्तन करणारा आरोपी संदीप तुकाराम गोपनारायण (२७) रा. घुसर याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने शनिवारी तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार १० मे २०१९ रोजी मुलगी ही शौचालयास जात असताना, आरोपी संदीप गोपनारायण याने तिचा पाठलाग करून लज्जास्पद वर्तन करून मोबाइलमध्ये सेल्फी काढला व तिला धमकी दिली. आरोपी तिचा १० ते १५ दिवसांपासून पाठलाग करीत होता. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५४ अ, ड व पोक्सो ११, १२ नुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. पुरावे, साक्ष मानून न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास, तीन हजार रूपये दंड, न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शितल भुतडा यांनी बाजु मांडली. तपास पीएसआय राहुल वाघ यांनी केला होता.

Web Title: misbehaviour of girl three years imprisonment for youth crime news