अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:08 IST2019-08-21T10:08:43+5:302019-08-21T10:08:48+5:30
अल्पवयीन मुलीला पाहून युवकाने तिच्यासोबत बळजबरीने लगट करून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; आरोपीस अटक
अकोला : घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीला पाहून युवकाने तिच्यासोबत बळजबरीने लगट करून तिच्यासोबत अश्लील चाळे केले; परंतु मुलीने आरडाओरड केल्यामुळे युवक पळून गेला. अकोट फैल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची भाची रडत घरी आली. तिची चौकशी केल्यानंतर तिने मंगळवारी सायंकाळी घरात काम करीत असताना, भारत नगरातील इमरान खान चाँद खान हा घरी आला. त्याने तुझा भाऊ कुठे आहे, असे विचारले. त्यामुळे पीडित मुलीने तो बाहेर गेला, असे उत्तर दिले. त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करून बळजबरीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी इमरान खान हा पळून गेला. मुलीच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ, ४५२, पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)