अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

By Admin | Updated: May 13, 2014 20:50 IST2014-05-13T20:34:45+5:302014-05-13T20:50:26+5:30

मोठी उमरी परीसरातील युवकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

A minor girl was chased away | अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अकोला: शहरातील मोठी उमरी परिसरात राहणार्‍या युवकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी सिव्हिल लाईन पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मोठी उमरी परिसरातील अष्टविनायक नगरात राहणारा सागर इंगळे (३0) नामक युवकाने परिसरातीलच राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. सोमवारी अल्पवयीन मुलीने महाविद्यालयात दाखला आणायला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले; परंतु अल्पवयीन मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांकडे शोध घेतला; परंतु मुलगी आढळून आली. कुटुंबीयांनी सागर इंगळे याच्याकडे चौकशी केली असता, तो सुद्धा घरातून निघून गेल्याचे कळले. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सागर इंगळे यानेच आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: A minor girl was chased away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.