अल्पवयीन मुलीचा विनयभंग : युवकास तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:39 IST2019-08-03T17:39:31+5:302019-08-03T17:39:36+5:30
अकोट (अकोला) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी युवकास अकोटच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : युवकास तीन वर्षांची शिक्षा
अकोट (अकोला) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी युवकास अकोटच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
१६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपी साजिद शहा व शहाबाज शहा यांच्याविरुद्ध २० आॅगस्ट २०१५ रोजी भादंवि कलम ३५४ डी , ५०६ व पोक्सो कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक शरद भस्मे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरण हे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अकोट यांचे न्यायालयात चालले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वतीने आरोपी नं २ ने बचावाचा पुरावा म्हणुन स्वत: पुरावा दिला. आरोपी पैकी आरोपी शहाबाज शहा याचे विरूध्द गुन्हा सिद्ध झाल्याने वि . अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोट एस.ए. श्रीखंडे यांचे न्यायालयाने त्यास पोक्सो कलम १२ अंतर्गतमध्ये तीन वर्षे सक्त मजुरी व रु २००० / - दंड व भादवि कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपीस एकाच वेळी भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा सरकारी वकील जी .एल. इंगोले यांनी बाजु मांडली. त्यांना तेल्हारा पोलीस स्टेशन येथील पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरिक्षक विजय जांभळे यांनी सहाय्य केले.