मूर्तिजापूर येथे शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:56 IST2017-09-04T01:55:55+5:302017-09-04T01:56:26+5:30
मूर्तिजापूर: आपसात आपुलकी ठेवून प्रेम, एकता दाखवून मूर्तिजापूर तालुक्यातील जनतेने एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सण, उत्सव साजरे करावे, असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत १ सप्टेंबर रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.

मूर्तिजापूर येथे शांतता समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: आपसात आपुलकी ठेवून प्रेम, एकता दाखवून मूर्तिजापूर तालुक्यातील जनतेने एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सण, उत्सव साजरे करावे, असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत १ सप्टेंबर रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे, प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार मिसाळे, विद्युत वितरण कंपनीचे कमलेश मसके, नगर परिषदेचे अभियंता धनश्री वंजारी, आरोग्य अधिकारी नरसिंह चावरे, माजी नगराध्यक्ष द्वारका दुबे, मौलाना जफर खतीफ, भाऊसाहेब खांडेकर, आयोजक ठाणेदार गजानन पडघन मंचावर उपस्थित होते. शहराची शांतता कायम राहावी यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांनी रीतीप्रमाणे मिरवणूक काढून व अडचण असेल ती निकाली काढून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार गजानन पडघन यांनी केले.
या बैठकीला उपनिरीक्षक गायकवाड, आरोग्य सभापती सचिन देशमुख, नगरसेवक लाला डाबेराव, माजी न.प. उपाध्यक्ष लखन अरोरा, ज्ञानेश्वर गढवाले, मुन्ना खतीब, शे. इमरान शे. खलील, निजामुद्दीन इंजीनियर, कैलाश महाजन मोहन वसुकार, रामा देशमुख, शफी खान, अजहरअली नवाब, गजानन चौधरी, गंपू शर्मा, राहुल गुल्हाने, मधू अवलवार, दिलीप जामनिक, कृष्णराव गावंडे, दीपक अग्रवाल, अनवर खान, विशाल नाईक, विलास नसले, अथर खान, गौरव अग्रवाल, मो. शारीक कुरेशी, जयप्रकाश रावत, प्रकाश श्रीवास, उमेश साखरे, चेतन नागवान, ज्ञानेश्वर देशपांडे, सोहेल रिजवान, हर्षद साबळे, गणेश मंडळाचे सदस्य समिती सदस्य उपस्थित होते. संचालन अन्वर खान यांनी केले तर आभारप्रदर्शन ठाणेदार गजानन पडघन यांनी केले.