शेतकरी संघटनेचे सामूहिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:40 IST2017-09-03T19:38:30+5:302017-09-03T19:40:23+5:30
अकोला : शासनाच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, ३ स प्टेंबर रोजी येथील अशोक वाटिका येथे एक दिवसीय सामूहिक उ पोषण करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे सामूहिक उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, ३ स प्टेंबर रोजी येथील अशोक वाटिका येथे एक दिवसीय सामूहिक उ पोषण करण्यात आले.
शेतकर्यांना अर्थभान देणारे, शेतीच्या शोषणाचा हिशेब मांडून शे तकर्यांच्या दु:खातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे, ‘भीक नको घेऊ घामाचे दाम!’, हा संदेश देऊन शेतकर्यांमध्ये स्वाभिमान पेटवण्यासोबतच शेतकरीविरोधी धोरणांशी आयुष्यभर संघर्ष करणारे योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शे तकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यातही शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी अशोक वाटिका येथे एक दिवसीय उपोषण केले. सकाळी ११ वाजता शरद जोशी यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून उपोषणाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता उ पोषणाची सांगता करण्यात आली. उपोषणाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, मनोज तायडे, डॉ. नीलेश पाटील, योगेश थोरात, अँड. मोरे, विजय देशमुख, अरुण नाकट, प्रा. ठाकरे, दिलीप लोडम, सुगद गावंडे, पत्रकार धांडे, रमेश आखरे, ज्ञानेश्वर गावंडे व गौतम इंगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शरद जोशी यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही -मनोज तायडे
शेतकर्यांना गुलामीतून मुक्त करून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार देणारा खरा नेता शरद जोशीच आहेत. त्यांच्या विचारांशिवाय शेतकर्यांना पर्याय नाही, असे मत शेतकरी नेते मनोज तायडे यांनी मांडले. स्थानिक अशोक वाटिका येथील महा त्मा फुले स्मारकासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी युवा आघाडी अध्यक्ष अविनाश नाकट, सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, शेतकरी नेते धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, संदीप महल्ले, विजय देशमुख, संदीप वाकोडे, अजय इंगळे, झुंजारराव पाटील, हसन भाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.