दिसायला सुंदर नसल्याने विवाहितेचा छळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:57 IST2019-01-04T12:57:12+5:302019-01-04T12:57:26+5:30

अकोला: विवाहिता दिसायला सुंदर नसल्यामुळे तिचा छळ करून तिला माहेरहून ५0 हजार रुपयांचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.

Married women harrashment by in law's because of not beautiful | दिसायला सुंदर नसल्याने विवाहितेचा छळ!

दिसायला सुंदर नसल्याने विवाहितेचा छळ!

अकोला: विवाहिता दिसायला सुंदर नसल्यामुळे तिचा छळ करून तिला माहेरहून ५0 हजार रुपयांचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.
गवळीपुऱ्यात राहणारी शबनूर निजाम गौरवे (वय २३) हिच्या तक्रारीनुसार तिचे निजाम जुम्मा गौरवे याच्याशी मे २०१६ रोजी लग्न झाले होते. निजाम यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो तिला नेहमीच मारहाण करीत असे, तसेच तू दिसायला सुंदर नाहीस, मला तू आवडत नाही, असे म्हणत तिचा सतत छळ करायचा. तिला नेहमी माहेरहून ५0 हजार रुपये आणण्याचा तगादा लावायचा. सासरा जुम्मा हसन आणि सासू हमीदाबी जुम्मा हेसुद्धा शबनूरचा छळ करायचे. शबनूरने रामदासपेठ पोलीस ठाण्यात १८ आॅगस्ट २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ही तक्रार महिला तक्रार निवारण कक्षाकडे पाठविली; परंतु या ठिकाणी त्यांच्यातील वाद मिटू शकला नाही. अखेर पोलिसांनी पतीसह सासू, सासºयांविरुद्ध भादंवि कलम ४९८(अ) नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Married women harrashment by in law's because of not beautiful