शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

६ हजार रुपये दिले तरच ‘बीपीएमएस’मधून नकाशा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 10:36 IST

Akola Municipal Corporation News संगणक चालकाकडूनच शासनाच्या उद्देशाला नख लावण्याचे काम केल्या जात आहे.

ठळक मुद्देदाेन-दाेन महिने सूचना न देता त्रुटी काढल्या जात नसल्याचे समाेर आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यात सत्ताधारी भाजपला अपयश येत आहे.
- आशिष गावंडेअकाेला: महापालिकेच्या नगररचना विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठल्याची परिस्थती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या महाआयटी विभागाने बांधकाम परवानगी देण्यासाठी ‘बीपीएमएस’प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश दिले असता संगणक चालकाकडूनच शासनाच्या उद्देशाला नख लावण्याचे काम केल्या जात आहे. मालमत्ताधारकांनी ६ हजार रुपये माेजल्यानंतरच या प्रणालीद्वारे तातडीने नकाशा मंजूर केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.एकीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिक तसेच बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देत १५० चाैरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामासाठी मनपाच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले असतानाच दुसरीकडे मनपाच्या नगररचना विभागात ‘बीपीएमएस’प्रणालीद्वारे नकाशा मंजुरीसाठी अकाेलेकरांची खुलेआम आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा प्रकार समाेर आला आहे. सदर ऑनलाइन प्रणालीद्वारे नकाशा सादर केल्यानंतर प्रस्तावातील त्रुटी लवकरात लवकर दूर हाेऊन मालमत्ताधारकांना दिलासा मिळावा, असा शासनाचा उद्देश आहे. ही प्रणाली हाताळण्यासाठी शासन स्तरावरून संगणक चालकाची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्याचे एक वर्षाचे मानधन मनपा प्रशासनाने शासनाकडे जमा केले आहे; परंतु मागील काही दिवसांपासून या प्रणालीअंतर्गत नकाशा सादर केला असता, मालमत्ताधारकांना चक्क दाेन-दाेन महिने सूचना न देता त्रुटी काढल्या जात नसल्याचे समाेर आले आहे. त्रुटी दूर करून नकाशा मंजुरीचा मार्ग माेकळा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून पाच ते सहा हजार रुपये वसूल करण्याचा सपाटा या विभागातील संगणक चालकापासून ते वरिष्ठ प्रभारी अधिकारी तसेच दाेन कनिष्ठ अभियंत्यांनी सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकाराला आळा घालण्यात सत्ताधारी भाजपला अपयश येत असल्याचे पाहून अकाेलेकरांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.संबंधित संगणक चालकाचे प्रताप कानावर आले असून त्याची सेवा बंद करण्याबाबत दीड महिन्यांपूर्वीच आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घेण्यास दिरंगाई हाेत आहे.- अर्चना मसने महापाैर, मनपास्वप्नातील घर बांधताना मनपाने लवकर नकाशा मंजूर करावा, अशी नागरिकांची इच्छा असते. नगररचना विभागातील बेताल कारभारासंदर्भात आयुक्तांना सूचना केली आहे. त्यांनी याेग्य निर्णय घ्यावा.- विजय अग्रवाल, माजी महापाैर‘बीपीएमएस’ची ऑनलाइन प्रणाली असाे वा ऑफलाइन प्रस्ताव सादर करणाऱ्या मालमत्ताधारकांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक बाजूला सारल्या जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. यासंदर्भात कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा
टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला