मंगेश बुंदे यांची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:06 IST2020-01-01T14:06:45+5:302020-01-01T14:06:51+5:30

मंगेश बुंदे असे युवकाचे नाव असून, त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

Mangesh Bunde was strangled to death | मंगेश बुंदे यांची गळा आवळून हत्या

मंगेश बुंदे यांची गळा आवळून हत्या

अकोला: बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा येथे एका इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास करताना वाशिम जिल्ह्यातील कोंढाळा येथील रहिवासी मंगेश बुंदे असे युवकाचे नाव असून, त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्या करणाऱ्या गजानन भाकरे याला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रिधोरा परिसरात २५ डिसेंबरच्या पहाटे एका नाल्यात एका इसमाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. सदरचा मृतदेह हा वाशिम जिल्ह्यातील कोंढाळा येथील मंगेश सुभाष बुंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उत्तरीय तपासणीमध्ये या इसमाची गळा आवळून हत्या झाल्याच्या प्राथमिक माहितीवरून त्यांनी व्याळा येथील रहिवासी गजानन ऊर्फ बबलू लक्ष्मण भाकरे याला मंगळवारी अटक केली. त्यानंतर आरोपीस बाळापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी संशयावरून तसेच एका ओळखपत्रावरून ही हत्या व्याळा येथील गजानन भाकरे याने केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ तसेच त्यांच्या पथकाने कसून तपास केल्यानंतर त्याला अटक केली. त्यानंतर बाळापूर न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Web Title: Mangesh Bunde was strangled to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.