तेल्हाऱ्यात इसमाची जाळून हत्या; मृतदेह घरासमोर आणून टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:06 IST2019-03-10T12:06:07+5:302019-03-10T12:06:57+5:30

तेल्हारा: येथील ५० वर्षीय इसमाची जाळून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर सदर इसमाचा मृतदेह त्याच्या घरासमोर आणून टाकला.

Man murder in Telhara, dead body found infront of his house | तेल्हाऱ्यात इसमाची जाळून हत्या; मृतदेह घरासमोर आणून टाकला

तेल्हाऱ्यात इसमाची जाळून हत्या; मृतदेह घरासमोर आणून टाकला

तेल्हारा: येथील ५० वर्षीय इसमाची जाळून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर सदर इसमाचा मृतदेह त्याच्या घरासमोर आणून टाकला. या घटनेमुळे तेल्हारा तालुक्यात एकच खडबड उडाली आहे. रमेश ओंकार हागे असे मृतकाचे नाव आहे.
तेल्हारा शहरातील संभाजी चौकात राहणारे रमेश ओंकार हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून ते शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते शनिवारी मजुरीसाठी शेतामध्ये गेले होते. सकाळी घराबाहेर पडलेले रमेश हागे हे रात्री पर्यन्त ते घरी आले नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. रविवारी सकाळी पहाटे रमेश हागे यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ जळलेला तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तपासणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. रमेश हागे यांच्या हत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आले नाही. रमेश हागे यांच्या पश्चत पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

 

Web Title: Man murder in Telhara, dead body found infront of his house