धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:54 IST2020-08-23T12:54:14+5:302020-08-23T12:54:30+5:30

माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले.

A man arrested with a sharp weapon | धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

अकोला : गणरायाच्या आगमनासाठी भाविक उत्साहात असतांनाच डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डाबकी रेल्वे गेटजवळ धारदार शस्त्र घेउन सार्वजनीक ठिकाणी एक युवक दहशत पसरवित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळताच त्यांनी शनिवारी रात्री सदर युवकास ताब्यात घेउन त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त केले.
डाबकी रोड रेल्वे गेट परीसरात शेख सद्दाम शेख कासम वय २२ वर्ष रा. फुकटपुरा नेहरू नगर खैर मोहम्मद प्लॉट हा युवक हातात लोखंडी धारदार शस्त्र घेउन या परिसरात येणाऱ्या जाणा-यांना धाक दाखवुन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले. सदर युवकाकडून एक लाकडी मुठ असलेला लोखंडी पाते असलेला कत्ता जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सदर आरोपीविरुध्द डाबकी रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत वांघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकूमार अ.बहाकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: A man arrested with a sharp weapon