जिल्हा शल्य चिकित्सकांकडे खंडणी मागणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 10:42 IST2021-06-10T10:42:01+5:302021-06-10T10:42:08+5:30
Man arested for seeking ransom from Civil Surgeon : वारंवार धमकी देऊन खंडणी मागत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली.

जिल्हा शल्य चिकित्सकांकडे खंडणी मागणारा गजाआड
अकोला : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या शिवनी येथील आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांना शिवनी येथील बुद्ध प्रकाश कॉलनी परिसरातील रहिवासी संघरक्षित गोपनारायण याने खंडणीची मागणी केली. वारंवार धमकी देऊन खंडणी मागत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी संघरक्षित गोपनारायण यास अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे करीत आहेत.