तिघा जणांची बाप-लेकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:30 IST2020-01-10T14:29:47+5:302020-01-10T14:30:09+5:30

किरकोळ वादातून अनोळखी तीन जणांनी घरी परतणाऱ्या बाप-लेकास थापडा-बुक्क्या व लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले.

Man and his son beaten by trio in Akola | तिघा जणांची बाप-लेकास मारहाण

तिघा जणांची बाप-लेकास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : किरकोळ वादातून अनोळखी तीन जणांनी घरी परतणाऱ्या बाप-लेकास थापडा-बुक्क्या व लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील लोणी येथील बाबूराव रामकृष्ण खेडकर (५९) यांच्या तक्रारीनुसार ते अकोल्यात दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा अमोलही त्यांना मदत करतो. ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बाबूराव व त्यांचा मुलगा हे दुचाकीवरून घरी जात असताना, वाशिम बायपासजवळ दुचाकीने आलेल्या अनोळखी तिघांनी त्यांना अडविले आणि आमच्या मित्रांना मारहाण का केली, असे म्हणता, दोघाही बाप-लेकांना बेदम मारहाण केली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Man and his son beaten by trio in Akola