शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद; सोन्याचे बनावट बिस्कीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 2:25 PM

अकोला: अकोला किंवा एक दोन जिल्ह्यांत नव्हे, तर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष देणारी मोठी टोळी माना पोलिसांनी रविवारी जेरबंद केली.

अकोला: अकोला किंवा एक दोन जिल्ह्यांत नव्हे, तर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष देणारी मोठी टोळी माना पोलिसांनी रविवारी जेरबंद केली. या टोळीतील नऊ सदस्यांना राष्ट्रीय महामार्गावरील चिचखेड शेतशिवारातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्रांसह सोन्याचे बनावट बिस्कीट व साहित्य जप्त करण्यात आले आहे.बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाची हत्या करीत दरोडेखोरांच्या टोळीने हैदोस घातला होता. या टोळीने लुटमार केल्यानंतर काही वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशाच प्रकारची टोळी दरोड्याच्या प्रयत्नात असताना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुुगे पोलीस कर्मचाऱ्यांसह रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात दरोडेखोरांची ही टोळी संशयास्पद हालचाली करीत असल्याचे घुगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिताफीने या टोळीवर पाळत ठेवली असता जंगली डुकराची शिकार करून त्याचे मांस ही टोळी शेतात खात असल्याचे त्यांना दिसले. यावरून माना पोलिसांनी सदर टोळीतील नऊ जणांना मांस खातानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. या टोळीतील सदस्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून सोन्याचे बनावट बिस्कीट, धारदार शस्त्र व लोखंड कापण्याची आरी, बनावट सोन्याची नाणी, मोबाइल, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी राज्यातील मोठ्या शहरात तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांना व ढाब्याच्या मालकांना लुटमार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. लुटमार करणाऱ्या टोळीची नावेही लुटमार करणारी टोळी बुलडाणा जिल्ह्यातील असून, यामध्ये दादाराव सीताराम पवार ६५, लहू दादाराव पवार ३३, जवाहरलाल दादाराव पवार २९, राहुल दादाराव पवार २६, ईश्वर अण्णा पवार २२, सोपान प्रभू चव्हाण २३, उदयसिंह बाळू पवार १९, सर्व रा. अंतरज तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा व सदाशिव सुधाकर चव्हाण २२, विनोद सुभाष पवार २८ रा. दधम तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा यांचा समावेश आहे. त्यांच्या आणखी काही साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. 

सोन्याचे बनावट बिस्किटाचे आमिषराज्यात सोन्याचे खरे बिस्कीट असल्याचे आमिष देऊन लुटमार करणारी टोळी माना पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीने अकोल्यातही अनेकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. त्यांच्याकडून बनावट बिस्कीट जप्त केल्यामुळे या टोळीचा खरा चेहरा समोर आला आहे. जंगली डुकराची केली शिकार!या टोळीतील नऊ जणांनी जंगली डुकराची शिकार केली. त्यानंतर चिचखेड येथीलच प्रकाश नामक शेतकºयाच्या शेतात त्याचे मांस खाण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता. या टोळीतील सदस्यांकडे धारदार शस्त्र तसेच मिरची पावडरचे मोठे पाकीट आढळल्याने ते या शिकारीनंतर रात्री उशिरा दरोड्याच्या तयारीतच असल्याचे घटनास्थळावरून जप्त केलेल्या मुद्देमालावरून स्पष्ट होत आहे.  

चिचखेड शिवारातून अटक केलेली ही टोळी दरोड्याच्या तयारीतच असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून लोखंड कापण्यासह लुटमारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने नांदेड, औरंगाबादसह काही शहरांमध्ये दरोडे टाकल्याची प्राथमिक माहिती असून, बाळापुरातील दरोड्यात यांचा संबंध आहे की नाही, याचा तपास करण्यात येत आहे, तसेच बनावट सोन्याचे आमिष देऊनही लुटमार केल्याची माहिती आहे.- भाऊराव घुगे,ठाणेदार, माना पोलीस स्टेशन, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी