प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:31 IST2019-05-18T12:31:12+5:302019-05-18T12:31:19+5:30

अकोला : शहरापासून जवळच असलेल्या पातूर मार्गावरील प्लायवूड बनविण्याच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

Major fire broke at Plywood factory in Akola | प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक

प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक


अकोला : शहरापासून जवळच असलेल्या पातूर मार्गावरील प्लायवूड बनविण्याच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. शनिवारी पहाटे लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ बंबांना चार ते पाच तासांचे अथक परिश्रम करावे लागले.
पातूर मार्गावरील हिंगणा फाटानजीक आर.के.एफ. कंपनीचा प्लायवूड बनविण्याचा कारखाना आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अर्थात शनिवारी पहाटे या कारखान्याला अचानक आग लागली. आग एवढी भयंकर होती की पाहता पाहता तीने अख्या कारखान्याला कवेत घेतले. आगीची माहिती समजताच महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठ शनिवारी सकाळपर्यंत तब्बल १५ बंब रिचविण्यात आली. या अग्नितांडवात कारखान्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. या आगीत १० ते १५ लाख रुपयांचा साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही. शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Major fire broke at Plywood factory in Akola