अकोला ग्रामीण जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी महेश गणगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 11:36 IST2021-12-26T11:36:46+5:302021-12-26T11:36:54+5:30

Mahesh Gangane : महेश गणगणे यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्हा काँग्रेसमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Mahesh Gangane as Akola Rural District Congress Working President | अकोला ग्रामीण जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी महेश गणगणे

अकोला ग्रामीण जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी महेश गणगणे

अकोला : अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले ॲड. महेश सुधाकरराव गणगणे यांची नियुक्ती अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, तसे पत्र त्यांना शनिवार, २५ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.

विद्यार्थी काँग्रेसपासून आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या महेश गणगणे यांची २००८ मध्ये अकोला जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. युवकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या महेश गणगणे यांनी अनेक आंदोलनांमध्ये युवक काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. त्यांनी आजवर पक्षसंघटनेत विविध पदे भूषविली आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या कार्यशैलीने त्यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाची दखल घेत काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची नियुक्ती अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Mahesh Gangane as Akola Rural District Congress Working President