शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
2
Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
3
T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
4
Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"
5
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
6
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
7
कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
8
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
9
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
10
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
11
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
12
"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?
13
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
14
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
16
"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य
17
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
18
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
20
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा

Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:15 PM

बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उमेदवारीपासून डावललेल्या इच्छुकांनी मतदारसंघात नाराजीची हवा निर्माण केली असून, पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले आहे. बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत.बाळापूर मतदारसंघ हा गत दहा वर्षांपासून भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. भारिप आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रिंगणात असून, यावेळी विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी बंडाचे निशाण फडकवित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.याच मतदारसंघात ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या डॉ. रहेमान खान यांनी ‘एमआयएम’चा झेंडा खांद्यावर घेतला आहे. डॉ. खान हे बाळापूरसाठीच इच्छुक होते; मात्र पंधरा दिवसांपूर्वी ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी पत्रक काढून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोला पश्चिममधून डॉ. खान यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जाहीर विनंती केली होती. अकोला पश्चिममध्ये इमरान पुंजानी यांची उमेदवारी ‘वंचित’ने जाहीर केल्यामुळे अखेर डॉ. खान यांनी बाळापूरसाठी एमआयएमची साथ घेऊन रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. गुरुवारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी डॉ. खान यांची उमेदवारी जाहीर केली.अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी ‘वंचित’मध्येही वंचित राहावे लागत आहे’, असा आरोप करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.काँगे्रस आघाडीच्या जागा वाटपात बाळापूर हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला गेल्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची निराशा झाली आहे. यावर्षी प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसचा ‘पंजा’ नसेल. त्यामुळे इच्छुकांपैकी प्रबळ दावेदार असलेले प्रकाश तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे अजाबराव टाले यांनी काँग्रेसमध्ये उमेदवारी विकल्या जाते, असा आरोप करीत पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना गुरुवारी विदर्भ माझा पक्षातर्फे अकोला पूर्वची उमेदवारी देण्यात आली आहे.मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात भाजपसह, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन्ही तालुक्यांत पिंपळे यांच्याविरोधात बैठक घेत त्यांचे काम न करण्याचा जाहीर निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे येथे बंडाचे निशाण फडकेल, अशी शक्यता होती. ती गुरुवारी प्रत्यक्षात आली.भाजपाचे विधानसभा विस्तारक व तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. नाचणे हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषद सदस्य होत्या. नाचणे यांच्या रूपाने या मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले असून, आणखी काही नाराज रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अखेर काँगे्रसची उमेदवारी साजीद खान पठाण यांनाअकोला पश्चिम मतदारसंघाचा गुंता गुरुवारी रात्री सुटला व काँग्रेसची उमेदवारी महापालिकेतील गटनेते साजीद खान पठाण यांना घोषित झाली. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारीचे पारडे साजीद खान व डॉ. जिशान खान यांच्यामध्ये फिरत होते.गुरुवारी सकाळपासूनच या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर काँग्रेसच्या चौथ्या यादीत साजीद खान यांचे नाव झळकले. अकोला पश्चिम हा मुस्लीमबहुल मतदारसंघ असून, बाळापूर मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यामुळे येथे खान यांना उमेदवारी देऊन मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस