Maharashtra Bandh : अकोल्यात बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 12:19 IST2021-10-11T12:13:46+5:302021-10-11T12:19:21+5:30
Maharashtra Bandh: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंद पाळण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली.

Maharashtra Bandh : अकोल्यात बंदला प्रतिसाद
अकोला : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंद पाळण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली.
अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोड, नविन कापड बाजार, जुना कापड बाजार, किराणा बाजारातील दुकाने बंद ठेवण्यात आली. परिवहन सेवा व रस्त्यावरील वाहतुक मात्र सुरु होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोटार सायकर रॅली काढून व्यापार्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्यावतीने रतनलाल प्लॉट चौकात मौन धरणे देण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्येही बंदल संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.