शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 10:52 IST

भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानात अकोला पूर्व मतदारसंघात 55.77 टक्के मतदान झाले असून, भाजपाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याने, या मतदारसंघात पुन्हा भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ३५० मतदान केंद्रांवर २१ आॅक्टोबर मतदान घेण्यात आले. मतदानानंतर मतदारसंघात निवडणूक लढवित असलेल्या विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून १३ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. मतदारसंघात55.77 टक्के मतदान झाले असून, मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. मतदारसंघात झालेले मतदान बघता, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अटीतटीच्या लढतीत मतदारसंघात भाजपा पुन्हा वर्चस्व कायम राखणार की, वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असून, मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याबाबतचे चित्र मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-east-acअकोला पूर्वVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा