एम. राकेश कलासागर यांची बदली; अमोघ गावकर अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:52 IST2019-07-15T18:47:22+5:302019-07-15T18:52:31+5:30

अकोला :  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची पुणे येथे तांत्रीक सेवा व गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी ...

M. Rakesh Kalasagar replaces; Amogh Gaonkar Akola's new Superintendent of Police | एम. राकेश कलासागर यांची बदली; अमोघ गावकर अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक

एम. राकेश कलासागर यांची बदली; अमोघ गावकर अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक

अकोला:  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची पुणे येथे तांत्रीक सेवा व गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अकोला पोलीस अधीक्षक म्हणूण रेल्वे पोलीस नागपूरचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे. गावकर हे तरुण अन तडफदार पोलीस अधिकारी असून अत्यंत कडक आणि शिस्तप्रीय असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राज्यातील पोलीस अधीक्षक, उपायुक्त यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणूण अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे. एम राकेश कलासागर यांची पुणे येथे तांत्रीक सेवा व गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अमोघ गावकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. गावकर सद्या नागपूर रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक असून दबंग अधिकारी म्हणूण त्यांची ओळख असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

नवे एएसपी अतुल कुळकर्णी
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची बदली झाली कींवा नाही या संदर्भात संभ्रम आहे. मात्र अकोल्याचे नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूण अतुल कुळकर्णी यांची बदली करण्यात आली आहे.

Web Title: M. Rakesh Kalasagar replaces; Amogh Gaonkar Akola's new Superintendent of Police