लक्झरी बसची उभ्या ट्रकला धडक; एक प्रवासी ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:25 IST2024-09-17T13:24:52+5:302024-09-17T13:25:08+5:30
बाळापूर (जि. अकोला ): पुण्याहुन अकोलाकडे येणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागुन धडक दिली. या ...

लक्झरी बसची उभ्या ट्रकला धडक; एक प्रवासी ठार, तीन जखमी
बाळापूर (जि. अकोला ): पुण्याहुन अकोलाकडे येणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागुन धडक दिली. या अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाला. तर चालकासह तीन जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७:३० वाजता पारसफाटा येथे घडली.
पुणे येथून रात्री निघालेली लक्झरी बस खामगाव शेंगाव येथील प्रवासी सोडून बसचा चालक तेथे उतरला. तिथे त्याने सहचालकाच्या ताब्यात बस दिली. पारसफाटा येथे उड्डाण पुलावरून अकोल्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक क्र. एम.एच. १८ बीजी २७३६ ला. मागून धडक दिली.
यात चालकाच्या मागील बाजुस बसलेल्या धन्नुसिंग चिल्लु पट्टे वय ६० रा. रोहितनगर मलकापूर जि. बुलढाणा हे जागीच ठार झाले, तर बसच्या चालकासह तीन जखमी झाले. या जखमीवर बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लक्झरी बसमध्ये अकोला येथे जाणारे ८ प्रवासी होते. याबाबत बाळापूर पोलिस पुढील तपास करीत आहे.