शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

लोकमत संस्कारांचे मोती :  मृणाल सिरसाटचे विमानात बसण्याचे, संसद भवन अनुभवण्याचे स्वप्न साकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:07 PM

विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच केवळ ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया अकोल्यातील येथील हवाई सफर विजेती विद्यार्थिनी मृणाल प्रशांत सिरसाट (१४) हिने व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत मृणाल सिरसाट हिने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत ती जिल्ह्यातून विजेती ठरली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मृणाल सिरसाट २६ जून रोजी सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचली.संस्कारांचे मोती स्पर्धेमुळे तिला विमान प्रवास, दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे अनुभवण्याची संधी मिळाली.

अकोला: मुलांना विमानाचे भारी आकर्षण. विमानात बसून, आकाशाची छान सैर करायची हौस असते. ती हौस काही पूर्ण होत नाही; परंतु त्यांची ती स्वप्ने, त्यांची हौस पुरविण्याचे काम ‘लोकमत’ने केले. बालवयातच विमान सफर, संसद भवन, राष्ट्रपती भवन, ऐतिहासिक लाल किल्ला, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. मोठे होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच केवळ ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया अकोल्यातील येथील हवाई सफर विजेती विद्यार्थिनी मृणाल प्रशांत सिरसाट (१४) हिने व्यक्त केली.‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत मृणाल सिरसाट हिने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत ती जिल्ह्यातून विजेती ठरली. नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी तिची निवड झाली. २६ जून रोजी रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या मृणालने ‘लोकमत’शी गुरुवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या अविस्मरणीय आठवणी कथन केल्या.संस्कारांचे मोती उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मृणाल सिरसाट २६ जून रोजी सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचली. तेथील विमाने पाहून मृणाल अक्षरश: भारावून गेली. विमानात बसल्यावर दीड तासांत आम्ही सर्वजण दिल्लीला पोहोचलो. पहिल्यांदाच विमानात बसण्याची भीतीही वाटत होती आणि आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिल्लीला गेल्यावर गोवा, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. विमानतळावर बस घ्यायला आली. बसमध्ये बसूनच राजधानी दिल्लीची सैर केली. जे टीव्हीवर पाहायला मिळायचे, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. सर्वकाही स्वप्नवत वाटत होते. मृणाल बोलत होती. दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास संसद भवनात पोहोचलो. या ठिकाणी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी स्वागत केले. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. एवढेच नाही, तर राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लाल किल्लासुद्धा पाहायला मिळाला. हे सर्व पाहून आम्ही विद्यार्थी भारावून गेलो, अशा शब्दात मृणाल सिरसाट हिने तिचे प्रवास वर्णन सांगितले. रात्री १0 वाजता दिल्ली विमानतळावरून आम्ही नागपूरकडे हवाई उड्डाण केले. एकूणच संपूर्ण प्रवास आनंददायी आणि स्वप्नवत होता, असे मृणाल म्हणाली.

विमान, दिल्ली अनुभवण्याचे स्वप्न पूर्ण!मृणाल प्रशांत सिरसाट ही नोएल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. वडील प्रशांत सिरसाट हे निंबी मालोकार येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. आई मनीषा ही नोएल स्कूलमध्ये शिक्षिका आहे. आई मनीषा सिरसाट यांनी मृणालचे विमानात बसविण्याचे स्वप्न केवळ ‘लोकमत’मुळे पूर्ण होऊ शकले. यासोबतच लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धेमुळे तिला विमान प्रवास, दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे अनुभवण्याची संधी मिळाली. राजकीय नेत्यांसोबत संवाद साधायला मिळाला. त्यामुळे ‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंटParliamentसंसद