लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकमत बाल विकास मंच सदस्यांना प्रचंड उत्सुकता लागून असलेला यावर्षीचा पहिला धमाकेदार कार्यक्रम सुप्रसिद्ध जादूगर अमित सोलंकी यांच्या ‘मॅजिक शो’ने विद्यार्थ्यांसोबतच पालकांवरही जादू केली. रविवारी स्थानिक खंडेलवाल भवन येथे भरपावसातही बच्चे कंपनीसोबतच पालकांनीही एकच गर्दी करीत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी स्कॉलर किड्सच्या संचालिका सविता अग्रवाल, मुख्याध्यापिका राधिका कनोजिया व दीपा शर्मा सोबतच बाल विकास मंच सदस्य उपस्थित होते.त्याचप्रमाणे सोमवार रोजी प्रभात किड्स स्कुलच्या बाल विकास मंच सदस्यांकरिताही खास शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी जादूगार अमित सोलंकी यांचे स्वागत केले. अमित सोलंकी यांनी सोन्याची अंगठी गायब करणे, पेपर फाडून पूर्ण पेपर जोडणे, जळती सळई तोंडात टाकणे अशा एकाहून एक सरस व थक्क करून टाकणाऱ्या करामती दाखवित उपस्थितांची दाद मिळविली. तसेच बच्चे कंपनीलाही विविध जादूच्या प्रयोगांमध्ये सहभागी करून घेत एकच धमाल उडविली.
लोकमत बाल विकास मंच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता विविध उपक्रम राबिवत असतो आणि सर्व उपक्रम कौतुकास्पद असतात. यामार्फत विद्यार्थ्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या संधी मिळतात व विद्यार्थीही त्यामध्ये उत्सुकतेने सहभागी होतात. ‘मॅजिक शो’सारख्या कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते. लोकमत बाल विकास मंचचे मन:पूर्वक आभार. पुढील वर्षभरातील येणाºया कार्यक्रमांची उत्सुकता आहेच.- कविता पांडुरंग विखे, पालक