शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 1:07 PM

अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे.

- राजेश शेगोकार अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे. काँग्रेसने गेल्यावेळी पराभूत झालेले हिदायत पटेल यांनाच पुन्हा एकदा बोहल्यावर चढविले आहे, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रयोग घेऊन मैदानात आहेत. धोत्रे यांची मतदारसंघावर पकड मजबूत असून, प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व त्यांच्यामध्ये असलेल्या वैमनस्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर फरक पडलेला नाही, ही त्यांच्या जमेची बाजू आहे; मात्र २०१४ ची मोदी लाट आता नाही. धोत्रे यांच्या विरोधात सुप्त अशी नकारात्मक लाट आहे. त्यामुळेच यावेळी त्यांनी विकासाचा मुद्दा समोर केला आहे. गेल्या तीन दशकांतील निवडणुकांंचा मागोवा घेतला तर भाजपाचा विजय हा मतविभाजनाच्या ‘फॅक्टर’मुळे फारच सुकर होतो, हे अधोरेखित होते. १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामध्ये आघाडी झाल्याने मतविभाजन टळले व भाजपाला थांबविता आले. यावेळी मतविभाजनाचेच गणित पुन्हा एकदा मांडले जात आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे धाडस केले आहे, शिवाय एमआयएमला सोबत घेतले आहे. या समीकरणांमुळे काँग्रेसचीच मतपेढी धोक्यात आहे. त्यामुळेच धोत्रे यांना शह देतानाच काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकर यांच्यावरही मात करायची असल्याने पटेल यांना उमेदवारी देऊन अ‍ॅड. आंबेडकरांचीच कोंडी केली आहे. ही कोंडी फोडून मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या प्रयोगाच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ठरणार आहे. खासदार धोत्रे यांनी यावेळी विजय मिळविला तर ते या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा जिंकणारे पहिलेच खासदार ठरतील. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जिंकले तर काँग्रेसला सोबत न घेता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झालेच तर तब्बल तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल. त्यामुळे विजय कोणाचाही झाला तरी अकोल्यासाठी विक्रम ठरलेलाच आहे.

आम्ही विकासावर भर दिला आहे. अनेक योजना राबविल्या असून, काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीत आहेत. सिंचन, शेती, रस्ते, पाणी, स्वच्छतेसोबतच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचीही नाराजी नाही. सर्वांना सोबत घेतले आहे.- संजय धोत्रे, भाजपा.

काँग्रेस-आघाडीसोबत माझी लढतच नाही. भाजपा-शिवसेना युतीसोबत लढाई आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविणाऱ्या भाजपाच्या विरोधात ‘वंचितांनी’ रणशिंग फुंकले आहे. प्रचाराच्या दरम्यान लोकांमधील रोष दिसून येतो. त्यामुळे ही लढाई परिवर्तनाची लढाई आहे.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ‘वंचित’

  • कळीचे मुद्दे
  • सलग तिसऱ्यांदा खासदार असल्याने अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी मोडून काढण्यासाठी भाजपा विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात आहे.
  • काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊन अ‍ॅड. आंबेडकरांची केलेली कोंडी तर दुसरीकडे ओबीसी, मुस्लिमांचा जागर करण्यावर वंचितचा भर.
टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक