शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:11 AM

कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

अकोला : शहराच्या लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला.कोरोनामुळे गत तीन महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरण्ट्स, वाइन बार बंद असल्यामुळे मध्यपींचे चांगलेच वांदे झालेले असताना त्यांच्यासाठी बेकायदेशीररित्या दारूचा साठा उपलब्ध करणे तसेच दारू पिण्यासाठी विशेष व्यवस्था करून देणाऱ्या कलकत्ता ढाब्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. या ढाब्यावर दारूच्या पार्ट्या रंगतात अशी माहिती विशेष पथकाला होतीच मात्र त्यांनी या माहितीची खातरजमा केल्यानंतर पंधरा दिवस पाळत ठेवली. माहितीमधील सत्यता समोर आल्यावर रविवारी रात्री उशिरा कलकत्ता ढाब्यावर छापेमारी केली. या छापेमारीत दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला. तसेच या दारूची विक्री करणाºया ३५ जणांना अटक करण्यात आली आहे.आरोपींमध्ये जगदीप जसवंतसिंह ढालीवाल, वय ३१ वर्षे रा.कलकत्ता ढाबा, संतोष श्रीराम नागरे, वय ३३ वर्षे, रा.भारती प्लॉट याळापूर नाका,उमेश नागोराव अंधारे, वय ३९ वर्षे, रा.भिरड वाडी बाळापूर रोड, राहूल विजय जांगडे, वय ३६ वर्षे, रा.जुने शहर हरीहर पेठ, कमलेश मधूकरराव भरणे, वय ३५ वर्षे रा.शिव नगर जुने शहर, स्वप्नील रामदास इंगळे, वय ३० वर्षे, रा.कनाल रोड बाळापूर नाका, संदिप सुनील वानखडे, वय ३७ वर्षे रा.शिव नगर बाळापूर नाका, ललील दत्तात्रय झारकर, वय ३७ वर्षे रा.भारती प्लॉट बाळापूर नाका, आशीष प्रकाश सोसे, वय ३५ वर्षे रा.भारती प्लॉट जुने शहर, सुरज डीगांबर राजुरकर, वय २० वर्षे रा.खरप रोड दमाणी हॉस्पीटल, सुरज शंकर कराळे, वय ३४ वर्षे रा.पारस वियूत कॉलनी, ता.बाळापूर, जितेंद्र रमेश जांगळे, वय ३८ वर्षे रा.हरीहर पेठ, राहूल अशोक बुंदेले, वय २४ वर्षे रा शिवनगर पाण्याच्या टाकीजवळ, गणेश केशवराव अटाळे, वय ३० वर्षे रा.शिवनगर, सचीन ज्ञानेश्वर गोतमारे, वय ३१ वर्षे रा.शिवनगर, मोहमंद शाहरूख मोहंमद फारूख, वय २६ वर्षे रा.हमजा प्लोट, आशुतोष प्रफुल बोदडे, वय १९ वर्षे रा.सहकार नगर गौरक्षण रोड, शुभम श्रीराम काटकर, वय २० वर्षे रा.वानखडे नगर, शेख शहजाद शेख नसीरोदिने वय २२ वर्षे रा पातूर, अब्दूल कलीम अब्दूल मुतलीब वय ३५ वर्षे रा गंगानगर वाशीम बायपास, गोपाल रमेश ढगे, वय २६ वर्षे रा.रिधोरा, गजानन देवीदास उईके, वय ३५ वर्षे रा.भारती प्लॉट शिवनगर. गणेश उत्तमराव भोगरे, वय ५५ वर्षे रा.भारती प्लॉट, आशीष जनार्दन मोहोकार, ३३ वर्षे रा.दिवेकर पोस्ट आॅफीसजवळ, जटारपेठ, मोहंमद शकील मोहंमद नजीर, वय ३४ वर्षे रा.बैधपूरा, विशाल दिनकर सोळणके, वय ३० वर्षे रा.रिधोरा, शैलेश सिताराम बाणीय, यय ३४ वर्षे रा.माळीपूरा चौक, पियुष राजेश पोपट, वय ३१ वर्षे रा.माणेक टॉकीज जवळ, रवी परशराम लखवानी, ३८ वर्षे रा.सिंधी कॅम्प, प्रतीक कैलाश रत्नपारखी, वय २३ वर्षे रा.डाबकी रोड, राजेश दामोधर तळोणे, वय ४० वर्षे रा.डाबकी रोड फडके नगर, सुभाष जोखनलाल विश्वकर्मा वय ३४ वर्षे रा.विठठल नगर मोठी अमरी, पंकज रामचंद्र विश्वकर्मा वय २९ वर्षे रा विठठल नगर मोठी उमरी, सैयद रियाजोद्दीन सैयद नसिरोरोदिन वय ३२ वर्षे रा.सोळाशे प्लॉट इंदीरा नगर, मोहीमोदीन कमोरोद्दीन वय १८ वर्ष, डाबकी रोड फळके नगर यांचा समावेश आहे.  बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराकडे बाळापूर पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची ही चर्चा आता जोरात सुरू आहे.

आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाईकोरोना च्या संकटात दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आलेले आहेत. मात्र उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून असल्याने पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून कारवाईचा सपाटा सुरूच आहे. अशातच रविवारी रात्री केलेली कारवाई ही आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6