लिलाबाई काकडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:10+5:302021-09-23T04:22:10+5:30

तेल्हारा: येथील नाथ नगरातील रहिवासी पत्रकार नंदकिशोर जनार्दन काकडे यांच्या मातोश्री लिलाबाई जनार्दन काकडे (७५) यांचे दि.२० सप्टेंबर ...

Lilabai Kakade passed away | लिलाबाई काकडे यांचे निधन

लिलाबाई काकडे यांचे निधन

तेल्हारा: येथील नाथ नगरातील रहिवासी पत्रकार नंदकिशोर जनार्दन काकडे यांच्या मातोश्री लिलाबाई जनार्दन काकडे (७५) यांचे दि.२० सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे.

-----------------

महानंदा पोटे यांचे निधन

अकोला: भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व श्री रुपनाथ महाराज संस्थान दहीहंडाचे अध्यक्ष गणेशराव पोटे यांच्या पत्नी महानंदा गणेश पोटे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार आहे.

-------------------------

श्रीरामजी गणपतराव शेटे

वरुर जऊळका: अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथील प्रतिष्ठित नागरिक व शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य राहिलेले श्रीरामजी गणपतराव शेटे (८३) यांचे दि.२१ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Lilabai Kakade passed away