शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या बैठकीकडे पाच आमदारांची पाठ

By admin | Updated: May 6, 2015 01:02 IST

पालकमंत्र्यांनी घेतला कामाचा आढावा

अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात लोकप्रतिनधी व अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील पाच आमदार अनुपस्थित होते. पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. एक आमदार, जिल्हा परिषदेचे सहा सदस्य आणि अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अंतर्गत कामांचा आढावा घेतला. शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकार्‍यांची बैठक ५ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी एकमेव आमदार हरीश पिंपळे उपस्थित होते. तर आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. बळीराम सिरस्कार व आ. प्रकाश भारसाकळे इत्यादी पाच आमदार बैठकीला अनुपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागातून कामांची गती वाढविण्याच्या दृष्टीने बोलविण्यात आलेल्या बैठकीला पाच आमदारांच्या अनुपस्थितीची मंगळवारी दिवसभर चर्चा होती. आमदारांची अनुपस्थिती राजकीय वतरुळातही चर्चेचा विषय ठरला. एक आमदार, जिल्हा परिषदेचे सहा सदस्य व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. ह्यजलयुक्त शिवारह्यच्या कामांसाठी लोकसहभागाची आवश्यकता असून, या अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांमध्ये लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी अधिकार्‍यांना यावेळी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.