मळणी यंत्रात सापडल्याने मजूर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:43 IST2017-10-23T00:40:22+5:302017-10-23T00:43:50+5:30
सायखेड (अकोला): सोयाबीन पिकाची काढणी सुरू असताना आदिवासी मजुराचा हात थ्रेशर मशीनमध्ये गेल्याने कापला गेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी चोहोगाव शिवारात सायंकाळी ४ वाजता घडली.

मळणी यंत्रात सापडल्याने मजूर गंभीर
ठळक मुद्देसोयाबीन पिकाची काढणी सुरू असताना घडली घटना आदिवासी मजुराचा हात थ्रेशर मशीनमध्ये गेल्याने कापला गेल्याची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड (अकोला): सोयाबीन पिकाची काढणी सुरू असताना आदिवासी मजुराचा हात थ्रेशर मशीनमध्ये गेल्याने कापला गेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी चोहोगाव शिवारात सायंकाळी ४ वाजता घडली.
येथील शेतकरी बंडूजी कोहर यांच्या शेतात शनिवारी सायंकाळी सोयाबीन काढणीचे काम सुरू होते. यावेळी सोंगलेले सोयाबीन मशीनमध्ये टाकताना कोथळी येथील अमोल वसंता मागाडे (२0) या युवा मजुराचा हात अचानक मशीनमध्ये गेल्याने तुटून बाहेर पडला. त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.