शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अकोल्यातील पहिल्या महिला आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:52 IST

अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देमुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.

अकोला : अकोला जिल्ह्यातील  पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.  गत काही दिवसांपासून आजारी असलेल्या कुसुमताई यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कुसुमताई कोरपे या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णसाहेब कोरपे यांच्या धर्मपत्नी होत.डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म १९ आॅगस्ट १९२८ रोजी सपकाळ कुटुंबात झाला. त्याकाळातील अकोल्यातील नामवंत कायदेपंडीत व राजकीय पुढारी अ‍ॅड. श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांचे वडील होत. त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री स्व. निळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ हे सुप्रसिद्ध वकील आणि सहकार नेते होते.  कुसुमताई यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवेचे व्रतस्थ असल्यामुळे त्यांचाही पींड समाजसेवेचा बनला. सुरवातीपासूनच त्यांचा ओढा विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी विद्यार्जन ठेऊन एम. ए. ची पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठाने विदर्भातील २० व्या शतकातल ग्रामीण नेतृत्वाचा विकास हा त्यांचा शोध प्रबंध स्वीकारून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातीील समाजकार्य प्रभावी राहिले. १९५७ ते १९६७ या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजोपयागी कार्ये केली. मुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत. जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. विधानसभेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. सिलिंग व कुळकायदा या बाबतचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनिय राहिले आहे.  महाराष्ट्र को. आॅप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि. मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका म्हणून राहिल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्या होत्या.  राजकीय व सामाजीक क्षेत्रात वावरतानाच आदर्श गृहिनी,आदर्श पत्नी व  आदर्श माता या भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांची दोन मुले व तीन मुली वैद्यक शास्त्रात उच्च विद्याविभूषित होऊन मानवी सुश्रृषेच्या पवित्र कार्यात व्रतस्थ आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूsocial workerसमाजसेवक