किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल २४ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:02 IST2018-09-11T18:01:57+5:302018-09-11T18:02:04+5:30

अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात सोमवार, २४ सप्टेंबर रोजी लागणार आहे

Kishore Khatri murder case verdict on 24th September | किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल २४ सप्टेंबरला

किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल २४ सप्टेंबरला

अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात सोमवार, २४ सप्टेंबर रोजी लागणार आहे. मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी असलेला निकाल तांत्रिक व काही सुट्यांच्या कारणामुळे २४ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली होती. मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी या हत्याकांडाचा अंतिम निकाल लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. मात्र, काही कारणास्तव हा निकाल २४ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Kishore Khatri murder case verdict on 24th September