अकोल्यात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक, तिसरा ताब्यात

By नितिन गव्हाळे | Updated: April 20, 2023 16:26 IST2023-04-20T16:26:29+5:302023-04-20T16:26:42+5:30

लोदखेड येथे जागेच्या वादातून फिरोज खान नामक व्यक्तीची तिघा जणांनी देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

Killed by firing from a country stick in Akola; Two arrested, third detained | अकोल्यात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक, तिसरा ताब्यात

अकोल्यात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक, तिसरा ताब्यात

अकोला : अकोट तालुक्यातील लोहखेड येथे जागेच्या वादातून तिघा जणांनी देशी कट्ट्याने फिरोज खान पठाण याच्यावर गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात दहीहंडा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. तिघाही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोदखेड येथे जागेच्या वादातून फिरोज खान नामक व्यक्तीची तिघा जणांनी देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणात दहीहंडा पोलिसांनी कादीर शाह इस्माईल शाह, कलीम शाह इस्माईल शाह रा. लोतखेड यांना अटक केली. तसेच तिसरा आरोपी सादिक खान रऊफ खान पठाण रा. लोतखेड यास ताब्यात घेतले. तिघाही आरोपींनी संगनमत करून फिरोज खान पठाण यांची जागेच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले. गत काही महिन्यांपासून आरोपी कादीर शाह व फिरोज खान पठाण यांच्यात वाद सुरू होता. अशी माहिती दहीहंडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Killed by firing from a country stick in Akola; Two arrested, third detained