शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 4:45 PM

२५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : पावसाळ्याचा पूर्ण दीड महिना उलटल्यावरही काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात तीळमात्र वाढ झाली नाही. २५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती. २५ जुलै २०१८ रोजी धरणात ११२४.४० फूट, ३४२.७२ मीटर, २९.७८९ द.ल.घ.मी. व ३४.४८ टक्के असा जलसाठा उपलब्ध होता. या तुलनेत यावर्षी महान धरणात ३१ टक्के जलसाठा कमी असून, २७ द.ल.घ.मी. पाणी कमी आहे.गेल्यावर्षी ५ जूनपासूनच धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नाही.अकोला शहराला पाणी पुरवठ्याकरिता महान धरणात दरवर्षी २४ द.ल.घ.मी. जलसाठा आरक्षित ठेवण्यात येतो; परंतु धरणात एकूण २.७२२ द.ल.घ.मी. पाणी साठा उरल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. महान धरणाचा जिवंत जलसाठा ११०७.०० वर येऊन संपतो. त्यानंतर मृत जलसाठ्यास सुरुवात होते. या पाणी पातळीप्रमाणे महान धरणात केवळ २ फूटच जिवंत जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या क्षेत्रात येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काटा कोंडाळा नदी अद्यापही कोरडीठण्ण!महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मालेगाव परिसरात दमदार पावसाची आवश्यकता आहे. कारण मालेगाव परिसरातून काटा कोंडाळा, जऊळका, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा इत्यादी ठिकाणी पाऊस झाल्यास ते पाणी काटा कोंडाळा नदीने महान धरणात येऊन मिळते. मालेगाव पाणलोट क्षेत्रातील कुरड, सुकांडा, सुधी, कोली, खडकी, मसला, सोनखास, ब्राम्हणवाडा, डव्हा आणि चाका तीर्थ असे दहा लघू तलाव आहेत. ते १०० टक्क्यांपर्यंत भरलेले नाहीत. वरील दहाही लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटा कोंडळा नदीच्या पात्रात वाहू शकत नाही.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई