प्रफुल्ल बानगावकर /कारंजा लाडपोतरुगीज स्थापत्य कलेशी साधम्र्य दाखविणारा आणि १0 हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात वसलेला कारंजातील आकर्षण काण्णव बंगला वास्तुकलेचा आदेश नमुना ठरावा असाच आहे. १९0३ साली बांधलेला हा भव्य गतकाळातील सोनेरी स्मृती जपून आहेत. लोकमान्य टिळकांपासून गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचे पदस्पर्श या बंगल्याला लाभले आहेत. त्याचबरोबर बंगल्याची विशेषता अशी की श्रीलंकेचे माजी पंतप्रधान यांच्या बंगल्याची हुबेहुब प्रतिकृती म्हणजे कारंजाचा काण्णव बंगला होय.काण्णव घराण्याची पाचवी पिढी बंगल्यात नांदत आहे. परिवारातील सदस्य मधुकरराव काण्णव यांनी लोकमतशी बोलताना पूर्वजांनी येथे येवून कापसाचा व्यापार केला. त्यामध्ये त्यांना मोठा नफा मिळाला. व्यापार्याच्या निमित्ताने ते वारंवार मुंबईला जात असत. तेथील ब्रिटीश व पोतरुगीज स्थापत्याच्या वास्तू पाहत ते प्रभावित झाले आणि या बंगल्याची निर्मिती झाली. १८९९ साली सुरुवात होउन बांधकाम चार वर्ष चालले. या एकमजली बंगल्यात एकूण ३६ दालने असून दारे, खिडक्या, फर्निचर त्यावर बनवले आहे. हे लाकूड त्या काळी आशिया खंडात श्रेष्ठप्रतिचे समजले जायचे. वास्तुच्या मधोमध ३0 बाय ३0 चौरस फुटांचा चौक आहे. काण्णवांचे पूर्व पुरुष कृष्णाजी यांच्या पिढीत बांधकाम झाले. पाया खोदताना खोलवर काळी माती होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आठ फुटावर शिसे धातूचा वितळून सहा इंची थर टाकण्यात आला. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे असून सोमरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ ओलीव बिडाचे आहेत. त्याचे वजन टनात आहेत. बांधणीचे काम काठेवाडी लोकांनी केले. सुतारकाम राजस्थानी कारागिरांनी केले. रंगरंगोटीचे काम विठोबा पेंटर (मुंबई) यांनी केले. श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा बंगला हुबेहुब असाच असल्याचे बोलले जाते. वरच्या मजल्यावर ५0 बाय ४0 चौरस फुटांचा दिवाणखाना आहे. हा दिवाणखाना महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तीशी आपले नाते सांगतो. स्वातंत्र्य लढय़ाच्या काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर कारंजात सभांच्या निमित्ताने आले, तेव्हा त्यांचा मुक्काम दिवाणखाण्यात झाला. बालगंधर्व, भाटेबुवा, शिरगोपीकर आदी नाटक कंपन्या कारंजात येत असत. यातील गायकांच्या स्वतंत्र मैफली काण्णवाकडे होत. त्यायोगे बालगंधर्व हिराबाई बडोदेककर, पंडित नारायणराव व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे आदींसह केशवराव भोळे व पंडित दिनानाथ मंगेशकराच्या मैफली दिवाणखान्यात पाहिलेल्या आहेत. पंडित दिनानाथ अनेकदा कारजांत आले आहेत. एकदा तर नुकतेच त्याचे लग्न झाले होते .अंगाची हळदही सुकली नाही अशा अवस्थेत त्यांची नाटक कंपनी कारंजात आली. दरवेळी त्यांना काण्णवांचे निमंत्रण असायचे.कालपरत्वे गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचा जन्म झाला. लता दिदी दोन वर्षाच्या असताना, दिनानाथाची कंपनी पुन्हा कारंजात आली. नेहमीप्रमाणे ते मैफलीसाठी काण्णवांकडे आले. लहानगी लता दिनानाथाची बोटं धरुन बंगल्यात फिरली आणि मैफील सुरु झाल्यावर त्याच जागी झोपली.
कारंजाचा काण्णव बंगला
By admin | Updated: September 18, 2014 02:42 IST