विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:29 IST2020-11-09T17:29:06+5:302020-11-09T17:29:23+5:30
Akola Crime News अल्पवयीन आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन आराेपी अटकेत
अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका ६ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी केली. एमआयडीसी परिसरातील एक चिमुकली तिच्या घरात खेळत असताना अल्पवयीन आराेपीने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व पाॅस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आराेपीस अटक करण्यात आली असून, ताे अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवल्याची माहिती आहे. ही कारवाई एमआयडीसी पाेलीस स्टेशनचे ठाणेदार किशाेर वानखेडे व त्यांच्या पथकाने केली.