कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जिवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:05 IST2018-11-18T14:05:04+5:302018-11-18T14:05:20+5:30
अकोला - अमरावती येथून राष्ट्रीय महामार्गाद्वारे कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत असलेल्या आठ गुरांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जिवनदान दिले.

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जिवदान
अकोला - अमरावती येथून राष्ट्रीय महामार्गाद्वारे कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत असलेल्या आठ गुरांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जिवनदान दिले. जब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुरांना गौरक्षण संस्थेत ठेवण्यात आले आहे.
स्थानीक गुन्हे शाखा पोलिस वाशिम बायपास परिसरात गस्तीवर असतांना त्यांनी समोरून येणारी पिकअप वाहनाला अडविले. यामध्ये असलेल्या वाहनात गुरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आठ गुरांना जिवनदान देण्यात आले असून वाहतुक करणाऱ्या दोघांविरुध्द जूने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्र्रकरणी गुरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाºया अकोला येथील रहिवासी मोहम्मद शहा बशीर शहा, अब्दुल जब्बार अब्दुल कादर कुरेशी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे दिनकर बुंदे व संदीप काटकर, दत्ता ढोरे व फीरोज खान यांनी केली.