अस्थी विसर्जनाला गेलेला इसम पूर्णा नदीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:59 IST2017-11-14T19:58:45+5:302017-11-14T19:59:18+5:30
शहरातील रामदेव नगरमध्ये राहणारा ४५ वर्षीय इसम वांगेश्वर येथील पूर्णा नदीमध्ये नातेवाइकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यास गेला असताना नदीत बुडाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली.

अस्थी विसर्जनाला गेलेला इसम पूर्णा नदीत बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : शहरातील रामदेव नगरमध्ये राहणारा ४५ वर्षीय इसम वांगेश्वर येथील पूर्णा नदीमध्ये नातेवाइकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यास गेला असताना नदीत बुडाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली.
शहरातील रामदेव नगरात राहणारे सुनील गोहर (४५) हे त्यांच्या नातेवाइकाच्या अस्थींचे विसर्जन करण्याकरिता १३ नोव्हेंबर येथे वांगेश्वर येथे गेले होते. तेथे अस् थी विसर्जन करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पूर्णा नदीत बुडाले. पूर्णा नदीला १३ नोव्हेंबर रोजी अचानक धरणाचे पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांनी त्यांना वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला; मात्र ते त्यांना वाचवू शकले नाही. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; मात्र मिळून आले नाही. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध घेणे सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.