शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीतील रस्त्याच्या कामाची चौकशी करणार

By admin | Updated: September 27, 2014 00:52 IST

बाश्रीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील दलित वस्तीत काँक्रीट रस्त्याचे निकृष्ट काम.

बाश्रीटाकळी : तालुक्यातील लोहगड येथील दलित वस्तीत २0 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकार्‍यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.तालुक्यातील लोहगड येथे समाजकल्याण विभागाद्वारे दलित वस्तीसुधार योजनेतून वार्ड क्र. १ मध्ये २0 लाख रुपयांच्या काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सदर कामाचे कंत्राट माजी जि.प. पदाधिकार्‍याच्या मुलाच्या नावावर देण्यात आले आहे. सदर काम हे त्याच परिसरात राहणारे व्यक्ती करीत असून, रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत रेतीचा वापर होत आहे. या रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकात कामासाठी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील रेतीचे दर देण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात या कामात मातीमिश्रीत चुरीचाच वापर होत आहे. रस्त्याचे काम कंत्राटदार स्वत: करीत नसून दुसरीच व्यक्ती हे काम करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत, या कामाची त्वरित चौकशी होऊन संबंधिताविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.