शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासस्थानांतील घुसखोरी थांबणार

By admin | Updated: June 20, 2015 02:29 IST

दंड व शुल्काची तरतूद; सेवा संपताच निवासस्थान खाली करावे लागेल.

बुलडाणा : शासकीय अधिकारी, कर्मचारी हे बदली, राजीनामा किंवा सेवानवृत्तीनंतर शासकीय निवासस्थानात वास्तव्य करताना आढळून आले आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये होणारी ही नियमबाह्य घुसखोरी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेवा संपताच विशिष्ट काळात शासकीय निवासस्थान रिकामे न करणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांवर दंड व शुल्क आकारण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. शासकीय वसाहतीमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर शासकीय निवासस्थान ताब्यात ठेवण्याची मुदत तीन महिन्यांची आहे. बरेचदा या शासकीय कर्मचार्‍यांच्या शिक्षण घेणार्‍या मुलांची मोठी गैरसोय होते. अल्प उत्पन्नगटातील कर्मचारी पूर्ण सेवा होईपयर्ंत स्वत:चे घर घेऊ शकत नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे तीन महिन्यांत पर्यायी व्यवस्था करणे कर्मचारी, अधिकार्‍यांना शक्य होत नाही. त्यामुळे एक ते दीड वर्षापर्यत त्यांचे वास्तव्य वाढते. त्याकरिता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १६ जून रोजी या आशयाचे आदेश दिले आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय निवासस्थांसाठी हे आदेश आहे. त्यानुसार कर्मचार्‍यांनी सेवासमाप्तीच्या किमान एक महिन्याआधी तसेच कर्मचार्‍याला सेवेतून कमी केल्यास, त्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांकडून कमाल सात दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच निवास वाटप समितीच्या अध्यक्षांना सदर बाब निदर्शनास आणूण द्यायची आहे.

*कर्मचा-यांवर दंडनीय दराने शुल्क

सरकारी निवासस्थानांमध्ये नवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांसह अनेकांनी वर्षानुवर्षे ठाण मांडले आहे. या सरकारी घरांमध्ये अनेकांनी तर चक्क भाडेकरू ठेवून उत्पन्नाचे स्रोतही निर्माण केले आहेत. याशिवाय बर्‍याच कर्मचारी, अधिकार्‍यांचा एकच नव्हे दोन शासकीय निवासस्थानांवर ताबा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशा कर्मचार्‍यांवर दंडनीय दराने शुल्क आकारण्याचे आदेश आहे.

*२९ वर्षांनंतर आदेशावर फेरविचार

       अशा कर्मचार्‍यांवर दंडनीय दराने अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे आदेश प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाने २३ डिसेंबर १९८५ मध्ये दिले होते. त्यानंतर २८ फेब्रुवारी १९८६ मध्ये या आदेशाला स्थगिती देण्यात आली; मात्र २0१५ मध्ये तब्बल २९ वर्षांनंतर याबाबत फेरविचार करून १६ जून रोजी दंडनीय दराने शुल्क आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.