प्रेरणादायी: दहा वर्षीय बालकाने केले दोन हजार बीज संकलन व रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:17 PM2019-05-06T13:17:14+5:302019-05-06T13:17:50+5:30

दहा वर्षीय बालकाने उन्हाळ्याच्या सुटीत वृक्षारोपण व संगोपनासाठी विविध जातीच्या वृक्षांच्या २ हजार बिया संकलन करून त्या पाऊस येताच रस्त्याच्या दुतर्फा व खुल्या जागेत रोपण करण्याचा संकल्प केला आहे.

Inspirational: Ten year old children have collected two thousand seeds | प्रेरणादायी: दहा वर्षीय बालकाने केले दोन हजार बीज संकलन व रोपण

प्रेरणादायी: दहा वर्षीय बालकाने केले दोन हजार बीज संकलन व रोपण

Next

- सत्यशील सावरकर

तेल्हारा: अमाप वृक्षतोड आहे. भूजल पातळी खोल जात आहे. जमिनीची प्रचंड धूप होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे. हा समतोल साधायचा असेल तर वृक्षारोपण, जल बचतीचे कार्य करणे गरजेचे आहे. या जाणिवेतूनच दहा वर्षीय बालकाने उन्हाळ्याच्या सुटीत वृक्षारोपण व संगोपनासाठी विविध जातीच्या वृक्षांच्या २ हजार बिया संकलन करून त्या पाऊस येताच रस्त्याच्या दुतर्फा व खुल्या जागेत रोपण करण्याचा संकल्प केला आहे. बीज संकलनाचा कार्य तो दोन वर्षांपासून करीत असून, त्याने वृक्षारोपण केलेली काही झाडे डौलदार झाली आहे.
शासनाच्यावतीने वृक्षारोपण व संवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालय यांना वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट दिले. ३३ कोटी वृक्षारोपण लागवडीचे लक्ष्य शासनाने निश्चित केले होते. यातून प्रेरित होत, तेल्हारा येथील संत सावता प्रबोधन कॉलनी येथील मंदार सचिन ठोंबरे (१0) या बालकाने वृक्ष बिया संकलन करून रोपण व संवर्धनासाठीचे कार्य सुरू केले आहे. बालपणापासूनच त्याला निसर्गाची आवड आहे. घराच्या परसबागेतील झाडांची नीगा राखण्याचे काम मंदार करतो. गत दोन वर्षांपासून उन्हाळ्यात सुटी लागताच तो स्वत: झाडांच्या बिया संकलित करतो. तसेच वर्षभरसुद्धा मिळालेल्या वेळातसुद्धा बिया संकलनाचे काम करतो. सध्या त्याच्याकडे २ हजार बिया गोळा झाल्या आहेत. मंदारच्या या उपक्रमामध्ये आई, वडील, बहीण व शेजारच्या मित्रसुद्धा मदत करतात. पावसाला सुरुवात झाल्यावर मंदार शहरात ठिकठिकाणी फिरून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व खुल्या जागेत संकलित केलेल्या बियांचे रोपण करतो. त्याच्या या उपक्रमात प्रबोधन व संत सावता कॉलनीमधील नागरिक हिरिरीने सहभागी होतात. मंदार वृक्षारोपण केलेले परिसरातील अनेक वृक्ष डोलताना दिसतात. मंदारसारख्या लहान मुलाने बीज संकलनाचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
 

 

Web Title: Inspirational: Ten year old children have collected two thousand seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.