आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:26 IST2020-09-16T16:25:56+5:302020-09-16T16:26:18+5:30

पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी पहीलीच भेट अकोला येथे दिली असून त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

Inspection in Akola by IG Chandrakishore Meena | आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी

आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी बुधवारी अकोल्यात दाखल होत नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करीत पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले.
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आठ दिवसांपुर्वी अमरावती आयजी पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर पहीलीच भेट अकोला येथे दिली असून त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत त्यांनी विविध विषयावर चर्चा करून पोलिसांची निवासस्थाने तसेच पेट्रोल पंप व पोलिस लॉन्ससह निर्माणाधिन असलेल्या नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीची माहिती घेतली. अकोल्यातील गुंडाचे कर्दनकाळ म्हणूण मीना यांची ओळख आहे. त्यामुळे मीना यांनी अकोल्यात भेट देताच गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.

 

Web Title: Inspection in Akola by IG Chandrakishore Meena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.