शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हार्‍यात 'प्रहार'चे अभिनव आंदोलन : शासनादेश वाचण्यासाठी गटविकास अधिकार्‍यांना चष्मा दिला भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:27 IST

ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळे आंदोलन केले. 

ठळक मुद्देअपंग निधी त्वरित खर्च करण्याची केली मागणीतालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींनी सन २०११-१२ पासून अपंगांवर एकही पैसा खर्च केला नसल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळे आंदोलन केले. अपंग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे या करिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या वार्षिक स्वउत्पनातील ३ टक्के निधी अपंग कल्याण व पुनर्वसनासाठी खर्च करण्याचा शासन निर्णय असला तरी, तेल्हारा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींनी सन २०११-१२ पासून अपंगांवर एकही पैसा खर्च केलेला नाही. ग्रामपंचायतींच्या या उदासिन धोरणामुळे सहा वर्षाचा अनुशेष निर्माण झाला असून,  अपंग बांधव त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. अपंग बांधवांवर झालेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तेल्हारा तालुका प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश पाटील खारोडे यांच्या नेतृत्वात तेल्हारा गटविकास अधिका-यांना शासनादेशाची प्रत व ती वाचण्यासाठी चक्क भेट म्हणून चष्मा देण्यात आला. याचबरोबर अपंग बांधवांवर त्यांच्या हक्काचा निधी नियमानुसार खर्च करून त्यांना न्याय द्यावा. तसेच हा निधी खर्च करण्यात कुचराई करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे एक निवेदन सादर करण्यात आले. तसेच मागण्या त्वरित मान्य न झाल्यास, आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी रवींद्र ताथोड, गजानन नेमाडे, वैभव खाडे, भैय्या खारोड, शिवा पाथ्रीकर, योगेश तीव्हाने, प्रफुल्ल दबडघाव, सागर पाथ्रीकर, वैभव पाथ्रीकर, प्रमोद तायडे, मुन्ना कडू, शुभम भिसे, अक्षय साखरे, रोषण खुम्कर, भूषण पाथ्रीकर गोपाल ताथोड, श्रीकांत ताथोड, पंकज कोरडे, शिवाजी जोध, यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Telharaतेल्हाराagitationआंदोलन