‘त्या’अपघातातील जखमीवर उपचार सुुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:50 IST2020-02-05T12:39:35+5:302020-02-05T13:50:08+5:30
४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती.

‘त्या’अपघातातील जखमीवर उपचार सुुरु
हिंगणी बु.: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी झालेल्या युवकावर अकोला येथील रुग्णालयात सुरु आहेत.
प्रदीप धनराज भिसे रा. ठिलोरी ता. दर्यापूर असे या युवकाचे नाव असून, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती.
ठिलोरी येथील प्रदीप भिसे सांगवी बाजार येथे दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर गर्दी केली. संकेत जानोरकर, नीलेश वरोळे आणि पराग गवई यांनी गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रदीप धनराज यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याप्रकरणी दहीहांडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)