घरात घुसून दोघींना मारहाण
By Admin | Updated: January 26, 2017 10:17 IST2017-01-26T10:17:01+5:302017-01-26T10:17:01+5:30
बोरगाव वैराळे येथील घटना; क्षुल्लक वादातून घडला प्रकार.

घरात घुसून दोघींना मारहाण
उरळ (अकोला), दि. २५- नजीकच्या बोरगाव वैराळे येथील एका घरात घुसून क्षुल्लक कारणावरून दोन महिलांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून गावातीलच एका इसमाविरुद्ध उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोरगाव वैराळे येथील पुरुषोत्तम मोतीराम वैराळे हे २४ जानेवारी रोजी रात्री ८.३0 वाजता त्यांच्या घरात असताना गावातील सागर धनराज वैराळे हा त्यांच्या घरी आला. त्याने ह्यतुम्ही माझ्या मुलीच्या घरी का आले नाहीह्ण जा कारणावरून पुरुषोत्तम वैराळे यांची पत्नी उषाबाई व भाची कीर्ती यांना मारहाण करून जखमी केले. या घटनेबाबत आरोपी सागर धनराज वैराळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.