वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 18:06 IST2019-08-19T18:05:58+5:302019-08-19T18:06:03+5:30
शेतकऱ्यांच्या शेतावर इंडो-इजराईल घनदाट लागवड पध्दतीचा प्रकल्प राबविण्यात आला.

वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प!
अकोला: विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले असून, शेतकऱ्यांच्या शेतावर इंडो-इजराईल घनदाट लागवड पध्दतीचा प्रकल्प राबविण्यात आला. आता हा प्रकल्प वºहाडातील अकोला,अचलपूर भागात राबविण्यात येणार आहे. याकरिता शासनाने दिड कोटी रू पये मंजूर केले .
विदर्भात जवळपास १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र आहे. पंरतु उत्पादन हेक्टरी ३ ते १० टन एवढेच मर्यादित असल्याने हे उत्पादन २५ टनापयर्यंत
वाढविण्यासाठी डॉ.पंदेकृविने विदर्भात इंडो-इजराईल प्रकल्प राबविण्यात आला. देश,विदेशात मागणी असलेल्या नागपुरी संत्र्याचे उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार असल्याने याकडे कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले. सुरू वातीला काटोल,नागपूर येथील शेतकºयांच्या शेतावर या प्रकल्पाची सुरू वात करण्यात आली. ही पध्दती यशस्वी होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांच्या अभ्यासात समोर आले आहे.
या प्रकल्पासोबतच कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातंर्गत संत्र्यावर स्वतंत्र संशोधन सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत भेसळयुक्त रोपांचा शोध घेतला जातो. शेतकºयांना दर्जेदार संत्र्याची रोपे मिळावीत याकरीता नर्सरीमधून विषाणू व रोगमुक्त संत्रा रोपे तयार करण्यात येत आहेत. आता हा प्रकल्प पश्चिम विदर्भातील अकोला व अचलपूर भागात घेण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, इंडो-इजराईल घन लागवड पध्दतीमध्ये संत्रा रोपे गादी वाफ्यावर लावण्यात येतात. ही झाडे मोठी होण्याच्या अवस्थेत त्यांची छाटणी करावी लागते तथापि त्यासाठी लागणारे यंत्र खेरदी व प्रकल्पासाठी शासनाने कृषी विद्यापीठाला दिड कोटी रू पये मंजूर केले आहे.
- नागपूरी संत्र्याचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने इंडो-इजराईल प्रकल्प राबविण्यात येत आहे. आता हाच प्रकल्प पश्चिम विदर्भात राबविण्यात येणार आहे.याकरीता शासनाने दिड कोटी मंजूर केले आहेत.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.