स्वातंत्र्य दिनाला एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ध्वज यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:38 PM2019-08-12T16:38:01+5:302019-08-12T16:38:07+5:30

अकोला: स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अकोल्यात प्रथमच एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात भव्य ध्वज यात्रा निघणार आहे.

Independence Day with a one-kilometer long national flag in Akola | स्वातंत्र्य दिनाला एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ध्वज यात्रा

स्वातंत्र्य दिनाला एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ध्वज यात्रा

Next

अकोला: स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अकोल्यात प्रथमच एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात भव्य ध्वज यात्रा निघणार आहे. यानिमित्त अकोल्यात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होणार असल्याची माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ध्वज यात्रेची सुरुवात जुने इन्कम टॅक्स चौकातून होणार आहे. अकोला क्रिकेट क्लब येथे या तिरंगी ध्वज यात्रेचा समारोप होणार आहे. ध्वज निर्मितेचे काम सध्या अ‍ॅड़ राजेश जाधव व सुनील उंबरकर यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यापूर्वीदेखील अकोल्यातील स्वातंत्र्य दिनाची दखल देशवासीयांनी घेतली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने विश्वविक्रमी भारताचा सर्वात मोठा ध्वज, १०० फूट उंचीचे अब्दुल कलाम यांचे तैलचित्र, एक एकरमध्ये देशभक्तीपर रांगोळी, ७६ मीटर लांबीचा केक, हत्ती-घोड्यांची रॅली, ४०० रिक्षांवर थोरांची ओळख यात्रा, तिरंगी पोशाखातील मोटारसायकल रॅली, तिरंगी एअर शो असे विविध कार्यक्रम ‘नॅशनल इंटिग्रिटी मिशन’च्यावतीने आयोजित केले होते. यावेळी नागरिक, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व व्यापार-उद्योजकांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.
यापूर्वी ६० फूट, ७० फूट, ३० मीटर लांबीचे तिरंगी ध्वज देशात विविध भागात तयार झाले आहेत; मात्र त्या तुलनेत एक किलोमीटर लांबीच्या तिरंगी ध्वजाचा विक्रम अकोल्याच्या नावे होणार असल्याचेदेखील परिषदेत सांगितले. अ‍ॅड़ राजेश जाधव, प्रा. डॉ. संतोष हुशे, अविनाश देशमुख, प्रा. नितीन बाठे, प्रा. प्रकाश डवले, उमेश मसने, पिंटू वानखडे, राजेश भन्साली, हरीश बुंदेले, मनोज अग्रवाल, पराग कांबळे, संकेत साबळे, मुकेश गव्हाणकर, निशिकांत बडगे, गोविंद प्रामाणिक, डॉ. साहू, जयशन गुडदे, संदीप देशमुख, मनीष कांबळे, निखिल ताले, विक्की पटोणे, गुड्डू चावरे, गणेश कटारे, राजेश बक्तेरिया, श्रीकांत घोगरे, अ‍ॅड़ भोरे, आशिष ढोमणे, नाना वैराळे, शुद्धोधन इंगळे, मनोहर पंजवाणी, संतोष पंजवाणी, इंद्रजित देशमुख, पवन अग्रवाल, मधुकर देशमुख, राजाभाऊ देशमुख, आशिष मांगुळकर व निखिल वाकोडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होणार असल्याचे परिषदेत सांगण्यात आले.

 

Web Title: Independence Day with a one-kilometer long national flag in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.