सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवा-गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:30 AM2017-02-14T00:30:14+5:302017-02-14T00:30:14+5:30

अमरावती विभागीय जि.प. कर्मचारी क्रीडा स्पर्धांचा समारोप.

Increase the reputation of the department by positively-Gupta | सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवा-गुप्ता

सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवा-गुप्ता

Next

बुलडाणा, दि. १३- विभागीय क्रीडा स्पर्धांमधून पुन्हा कामावर रूजू झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी नवऊर्जा घेऊन सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी केले. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ व समारोप आज झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, वाशिम जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, बुलडाणा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एन. आभाळे, अकोल्याचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अमरावती जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, अमरावतीचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे , यवतमाळच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, अकोल्याच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे व सर्व खातेप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Increase the reputation of the department by positively-Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.