मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:23 IST2025-05-14T09:13:16+5:302025-05-14T09:23:26+5:30
अकोल्यातील चार ते पाच सराफा दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे.

मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
अकोल्यातील चार ते पाच सराफा दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ही धाड नापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी टाकली आहे. आज (बुधवारी) सकाळपासून ही कारवाई सुरू आहे.
अकोला शहरातील चार ते पाच दुकानांवर धाड सुरू आहे. अकोल्यातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स या दुकांनांची नावे समोर आली आहेत. अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. या छापेमारीमुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
मागील वर्षीही आयकर विभागाची अकोल्यात धाड
मागील वर्षी मे महिन्यातच आयकर विभागाने अकोल्यात धाड टाकली होती. आयकर विभागाने नांदेड येथे केलेल्या कारवाई नंतर त्यांचा मोर्चा अकोला शहराकडे वळविला होता. नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील आंगडिया सर्विस एजन्सीच्या कार्यालयासह इतर दाेन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला.