पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार 

By रवी दामोदर | Updated: July 5, 2024 17:23 IST2024-07-05T17:22:06+5:302024-07-05T17:23:55+5:30

मध्य रेल्वेने नवी अमरावती ते पंढरपूर व नागपूर ते मीरज या दोन स्थानकांदरम्यान १३ ते २० जुलै या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

in akola amravati pandharpur and nagpur meraj special trains will run for ashadhi ekadashi | पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार 

पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार 

रवी दामोदर,अकोला :आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय म्हणून मध्य रेल्वेने नवी अमरावती ते पंढरपूर व नागपूर ते मीरज या दोन स्थानकांदरम्यान १३ ते २० जुलै या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा आठ फेऱ्या होणार असून, त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१११९ न्यू अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वे १३ व १६ जुलै रोजी दुपारी १४:४० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १६:२० वाजता अकोला स्थानकावर येऊन १६:३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११२० पंढरपूर-न्यू अमरावती विशेष रेल्वे १४ व १७ जुलै रोजी सायंकाळी १९:३० वाजता रवाना होणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १०:१० पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुपारी १२:४० वाजता न्यू अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे.

या स्थानकांवर थांबणार गाड्या-

या दोन्ही गाड्यांना अप व डाउन या दोन्ही बाजूंनी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा असणार आहे.

Web Title: in akola amravati pandharpur and nagpur meraj special trains will run for ashadhi ekadashi