शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद

By atul.jaiswal | Published: January 02, 2018 3:28 PM

अकोला: आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले.

ठळक मुद्देशहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले. रुग्णालयांमध्ये शुकशुकाट, बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.

अकोला: सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकिय आयोग (एनएमसी)विधेयकाविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) झेंड्याखाली देशभरातील डॉक्टरांनी मंगळवार, २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळत काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले.आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधीत्व करणाºया आयएमएने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे. खासगी वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अटी या विधेयक मंजूरीत रद्द होणार आहे. महाविद्यालयांचा मनमानी कारभार वाढून बोगस पदवीप्रदान डॉक्टरांची संख्या वाढणार, नियम भंग करणाºया डॉक्टरांना ५ कोटी ते १०० कोटी दंडाची तरतुद असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, वैद्यकिय शिक्षण महागडे होऊन त्यावर धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. केवळ पाच राज्ये प्रतिनिधीत्व असतील उर्वरित सर्व २९ राज्ये विन प्रतिनिधीत्व चालतील. सध्याची राज्य वैद्यकिय परिषदांची स्वायत्तता संपुष्टात येईल, विद्यापीठे नावापुरती उरतील. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. यामुळे आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे आयएमए ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांना निवेदन देण्यात आले.एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून पुढे सर्व डॉक्टरांकडून नियमितपणे बाह्यरुग्ण तपासणीला सुरूवात होणार असल्याची माहिती आयएमए सचिव डॉ. रणजीत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रुग्णालयांमध्ये शुकशुकाटसकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डॉक्टरांनी संप पुकारल्याने बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) बंद आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी बंद ठेवली आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.

आयएमए सभासदांची बैठकस्थानिक आयएमए हॉलमध्ये दुपारी आयएमए सभासदांची बैठक घेण्यात आली. आयएमए अकोलाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयएमएच्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. यावेळी एनएमसी विधेयकाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला सचिव डॉ. रणजीत देशमुख, डॉ. जुगल चिराणीया, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. शैलेश देशमुख यांच्यासह आयएमएचे सभासद उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरhospitalहॉस्पिटल