गौण खनिजाची अवैध वाहतूक; दोन वाहनांवर कारवाई; बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा शिवारातील घटना

By रवी दामोदर | Updated: September 30, 2023 21:58 IST2023-09-30T21:57:41+5:302023-09-30T21:58:20+5:30

या कारवाईमुळे गौण खनीजाची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

illegal transportation of minor mineral; Action on two vehicles; Incident at Vizora Shivara in Barshitakali Taluk | गौण खनिजाची अवैध वाहतूक; दोन वाहनांवर कारवाई; बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा शिवारातील घटना

गौण खनिजाची अवैध वाहतूक; दोन वाहनांवर कारवाई; बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा शिवारातील घटना

अकोला : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर बार्शीटाकळी महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे गौण खनीजाची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा शिवारातून दुपारच्या सुमारास अकोलाकडे जात असलेल्या दोन वाहनांमध्ये गौण खनिज आढळून आले. वाहतूक करणाऱ्या वाहनांची बार्शीटाकळी महसूल विभागाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता, दोन्ही वाहने गौण खनिजाची अवैध वाहतूक करीत असल्याचे तपासणीत समोर आले. कारवाईनंतर दोन्ही वाहने बार्शीटाकळी पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली. ही कारवाई बार्शीटाकळी महसूल मंडळ अधिकारी प्रमोद ठोसर, मंडळ अधिकारी पारसकर, तलाठी राजीक पांडे, खंडारे, मोकडे यांनी केली.
 

Web Title: illegal transportation of minor mineral; Action on two vehicles; Incident at Vizora Shivara in Barshitakali Taluk